Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मातोश्री'बाहेर घातपाताची शक्यता; बंदोबस्तात वाढ

'मातोश्री'बाहेर घातपाताची शक्यता; बंदोबस्तात वाढमुंबई : खरा पंचनामा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर घातापाताची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे मातोश्री परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मातोश्रीबाहेर काहीतरी घातपात करण्यात येणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर तेथील पोलिस सुरक्षेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यातूनच उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर काहीतरी विघातक होणार असल्याचा फोन आला. या फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मोतोश्रीच्या परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर घातपात होणार असल्याची समजल्यावर सुरक्षा वाढवली आहे. राज्य सरकारला या सगळ्याची कल्पना होती. या आधीही त्यांनी ठाकरे कुटुंबीयांची सुरक्षा कपात केली होती. आता केवळ काही पोलीस उभे केले आहेत. याने सुरक्षा कशी केली जाऊ शकते, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र या सगळ्यात राज्य सरकारचा हात असावा आणि हे जाणून बुजून केले जात आहे, असा गंभीर आरोप खासदार अरविंद सावंतांनी केला आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंची झेड प्लस सुरक्षा काढून झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली. आदित्य ठाकरेंची वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातून एक एस्कॉर्ट व्हॅनही कमी करण्यात आली होती. त्यामुळे आता मातोश्री बाहेर या फोन कॉलच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलीस मातोश्री बाहेर तैनात करण्यात आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.