Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर परिक्षेत्रातील १६ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या सांगलीतील दोघांना मुदतवाढ, १० जणांच्या विनंती अमान्य विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिले आदेश

कोल्हापूर परिक्षेत्रातील १६ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
सांगलीतील दोघांना मुदतवाढ, १० जणांच्या विनंती अमान्य
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिले आदेशकोल्हापूर : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील १६ सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांना ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर दहा अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज अमान्य करण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी या बदल्यांचे आदेश दिले आहेत. 

सांगली जिल्ह्यातील सहायक निरीक्षक पंकज पवार, जयश्री वाघमोडे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सांगलीतील तिघांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत तर सांगलीत नव्याने तीन अधिकारी येणार आहेत. कोल्हापुरातील पाचजणांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात तिघेजण नव्याने येणार आहेत. पुणे ग्रामीणकडील चार, सोलापूर ग्रामीणकडील दोन तर साताऱ्यातील एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. 

बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे बदली झाल्याचे ठिकाण : श्रद्धा आमले (कोल्हापूर ते सातारा), विश्वास पाटील (कोल्हापूर ते सोलापूर ग्रामीण), रोहित दिवसे (कोल्हापूर ते सातारा), जयश्री भोमकर (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), संदीप कांबळे (कोल्हापूर ते सांगली), ज्ञानदेव वाघ (सांगली ते कोल्हापूर), संदीप साळुंखे (सांगली ते पुणे ग्रामीण), दीपक जाधव (सांगली ते कोल्हापूर), दिलीप पवार (पुणे ग्रामीण ते सातारा), बिरप्पा लातुरे (पुणे ग्रामीण ते सांगली), पृथ्वीराज ताटे (पुणे ग्रामीण ते सातारा), निलेश माने (पुणे ग्रामीण ते सांगली), राजकुमार डुणगे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), विजय गोडसे (सातारा ते कोल्हापूर), प्रवीण संपागे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण).

कोल्हापूर येथील प्रशांत आवारे यांची पुणे ग्रामीणकडे बदली करण्यात आली आहे. मात्र पुणे ग्रामीण येथे पद रिक्त झाल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करावे असेही आदेशात म्हटले आहे. विनंती बदली अमान्य झालेल्यांमध्ये कोल्हापूर येथील दोन, सातारा येथील दोन, सांगलीतील तीन, सोलापूर ग्रामीणकडील दोन आणि पुणे ग्रामीणकडील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.