सांगलीतील तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
संजय मोरे सांगली शहरचे प्रभारी, शरद मेमाणे विट्याचे प्रभारी
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांची सांगली शहरच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी मंगळवारी बदल्यांचे हे आदेश दिले आहेत.
आटपाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी शरद मेमाणे यांची विटा पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जत पोलिस ठाण्याचे प्रभारी राजेश रामाघरे यांची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी या बदल्या करण्यात आल्या.
आता सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग, मिरज ग्रामीण, कडेगाव, आटपाडी, जत पोलिस ठाण्यांचे प्रभारी लवकरच नियुक्त करण्यात येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात नव्याने येणारे अधिकारी हजर झाल्यानंतर या बदल्या होण्याचे संकेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.