Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कागणरी येथे गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक गावठी कट्टा जप्त, उमदी पोलिसांची कारवाई

कागणरी येथे गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
गावठी कट्टा जप्त, उमदी पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

जत तालुक्यातील कागणरी येथे पूर्वीच्या भांडणावरून उसतोड सुरू असताना पिता-पुत्राला धमकावून त्यांच्या दिशेने गावठी कट्ट्याने गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली. 

प्रकाश तुकाराम लमाणी (रा. कागणरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. २४ डिसेंबर रोजी फिर्यादी पापण्णा लमाणी आणि त्यांचा मुलगा अभिजित याच्यासोबत उसतोड सुरू असलेल्या शेताजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी संशयित प्रकाश तेथे आला. त्यावेळी त्याने पापण्णा आणि अभिजित यांच्याशी पूर्वी झालेल्या भांडणावरून जोरजोरात वाद घालण्यास सुरुवात केली. नंतर खिशातून गावठी कट्टा काढून पिता-पुत्राचा दिशेने गोळीबार केला. त्यामध्ये अभिजित याच्या डाव्या मांडीवर गोळी लागल्याने तो जखमी झाला. 

याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर संशयित प्रकाश पसार झाला होता. मंगळवारी तो गावात येणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी कागणरी येथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

उमदीचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासाहेब हाके, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, सोपान भंडे, आप्पासाहेब घोडके, सुदर्शन खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.