Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोलापूर ग्रामीणमधील १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा आदेश

सोलापूर ग्रामीणमधील १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या 
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा आदेश



संभाजी पुरीगोसावी 
सोलापूर : खरा पंचनामा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील १३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी काढले आहेत. यामध्ये करमाळा माळशिरस अक्कलकोट कुर्डुवाडी पंढरपूर बार्शी येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

करमाळ्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची बदली पंढरपूर मंदिर सुरक्षा, अक्कलकोट उत्तर ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची आर्थिंक गुन्हे शाखा, कुर्डुवाडीचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची बदली मानव संसाधन कल्याण शाखा, पंढरपूर मंदिर सुरक्षाचे निरीक्षक मिलिंद पाटील यांची बदली जिल्हा विशेष शाखा येथे करण्यात आली आहे. 

बार्शीं तालुका पोलीस ठाण्यांचे अण्णासाहेब मांजरे यांची बार्शी शहर पोलीस ठाणे, माळशिरसचे राजेंद्र टाकणे यांची बदली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, नियंत्रण कक्षातील विनोद घुगे यांची बदली करमाळा पोलीस ठाणे, बार्शीचे संतोष गिरीगोसावी यांची बदली नियंत्रण कक्षात तर माढयाचे भीमराव खणदाळे यांची बदली सांगोला पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.

आर्थिंक गुन्हे निरीक्षक निवृत्ती मोरे यांची बदली वैराग पोलीस ठाणे, मानव संसाधन शाखेचे निरीक्षक बजरंग साळुंखे यांची बदली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष येथे, जिल्हा विशेष शाखेतील निरीक्षक कमलाका पाटील यांची बदली जिल्हा वाहतूक शाखा, पंढरपूर मंदिर सुरक्षाचे सुरेश चिल्लवार यांची बदली कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी तात्काळ पदभार घेवुन पोलीस  मुख्यालयाकडे तसा अहवाल सादर करावा असे देखील बदल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.