Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोन्याच्या बिस्किटाच्या प्रलोभनाने महिलांची फसवणूक करणाऱ्यास अटक सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, विटा पोलिसांची कारवाई

सोन्याच्या बिस्किटाच्या प्रलोभनाने महिलांची फसवणूक करणाऱ्यास अटक
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त, विटा पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

वयोवृद्ध महिलांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडील सोने घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सव्वा लाखांचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. 

पोपट रामभाऊ गायकवाड (वय ५८, रा. गांधीनगर, बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास विट्यातील जुने भैरवनाथ थिएटर येथे शीला माळी (रा. मादळमुठी) यांना पितळी बिस्कीट दाखवून ते सोन्याचे असल्याचे त्याने माळी यांना सांगितले. या बिस्कीटाच्या बदल्यात तुमच्याकडील सोन्याची माळ द्या असे म्हणून त्यांच्याकडील सोन्याची माळ काढून घेतले. माळी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत विटा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यातील संशयिताला तातडीने पकडण्याच्या सूचना निरीक्षक डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिल्या होत्या. 

पथक चोरट्याचा शोध घेत असताना हा गुन्हा पोपट गायकवाड याने केल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सव्वा लाख रूपये किमतीची सोन्याची माळ जप्त करून त्याला अटक करण्यात आली. 

विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश संकपाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.