Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा मोर्चासाठी कडक बंदोबस्त; एक हजार पोलिसांसह दंगलनियंत्रक पथक तैनात

मराठा मोर्चासाठी कडक बंदोबस्त; एक हजार पोलिसांसह दंगलनियंत्रक पथक तैनात



पुणे : खरा पंचनामा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी मोर्चा काढला असून, पुणे पोलिसांकडून मोर्चाच्या मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. एक हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात राहणार आहेत.

नगर रस्तामार्गे मोर्चा कोरेगाव भीमा येथे येणार आहे. कोरेगाव भीमा परिसराचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतो. २३ जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्चा खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी असणार आहे. वाघोली येथील आर. के. फार्मच्या मोकळ्या जागेत मुक्काम असणार आहे. तेथे एक हजार प्रसाधन गृह, रुग्णवाहिका, १०० पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह दोन पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, १२३ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच एक हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत. २४ जानेवारी रोजी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार असून, लोणावळा येथे मुक्कामी असणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.