Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन...'; अयोध्येतील सोहळ्यावरुन मनोज जरांगेंची मोठी घोषणा

'आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन...'; 
अयोध्येतील सोहळ्यावरुन मनोज जरांगेंची मोठी घोषणा



अहमदनगर : खरा पंचनामा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील हजारो मराठ्यांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. शनिवारी अंतरवली सराटी येथून निघालेला मोर्चा आज पुण्यात पोहोचणार आहे.

सध्या देशाचे अयोध्येत होत असलेल्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लक्ष लागलं आहे. या सोहळ्याविषयी विचारले असता आपण रेल्वे भरुन लोकांना अयोध्येला नेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

प्रभू श्रीराम यांच्या प्रतिष्ठापणेनिमित्त अहमदनगर शहरातील भिंगार भागातील श्रीराम मंदिरात मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी या परिसरातील नागरिकांनी देखील आरतीसाठी हजेरी लावली. आरती संपल्यानंतर जरांगे पाटील यांच्या मंदिर संस्थानच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला. आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरून अयोध्येला दर्शनासाठी जाणार असल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली.

आमचं आंदोलन नियोजित असल्याने अयोध्येला जाऊ शकलो नाही. आमच्या आंदोलनातच रामप्रतिष्ठापणा सोहळा साजरा करणार आहे," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.