Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी तपास SIT कडे सोपवण्यास नकार

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी तपास SIT कडे सोपवण्यास नकार



नवी दिल्ली : खरा पंचनामा

अदानी समूहाच्या कंपन्यांविरोधात हिंडेनबर्ग संशोधन अहवाल येऊन जवळपास एक वर्ष झाले आहे. अहवालात अदानी समूहाच्या कंपन्यांवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते. याच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.

जानेवारी 2023 मध्ये, गौतम अदानी यांच्या समुहाला मोठे नुकसान सहन करावे लागले होते कारण अदानी समूहावर अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात बाजारातील फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर या समुहाने सर्व आरोप फेटाळले.

अदानी प्रकरणात न्यायालयाने सांगितले की, सेबीच्या तपासात FPI नियमांशी संबंधित कोणतीही अनियमितता आढळली नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणात मर्यादित अधिकार आहेत, ज्याच्या आधारे तपास करण्यात आला आहे.

सेबीच्या नियामक चौकटीत प्रवेश करण्याचा न्यायालयाचा अधिकार मर्यादित आहे. सेबीच्या तपास नियमांमध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

मार्च 2023 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग अहवालाच्या आधारे अदानी समूहाने सिक्युरिटी कायद्यांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याचे निर्देश बाजार नियामक सेबीला दिले होते. न्यायालयाने माजी न्यायमूर्ती एएम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची तज्ज्ञ समितीही स्थापन केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.