Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनोज जरांगे पाटलांसोबत आता 24 तास 2 पोलीस असणार!

मनोज जरांगे पाटलांसोबत आता 24 तास 2 पोलीस असणार!



जालना : खरा पंचनामा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेकरिता आता 24 तास दोन सशस्त्र पोलिसांची सुरक्षा असणार आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने जरांगे पाटलांना ही सुरक्षा देण्यात आली आहे.

मागच्या पाच ते सहा महिन्यांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळं त्यांच्या जिवाला कोणताही धोका होवू नये म्हणून जरांगे पाटलांच्या सुरक्षेची मागणी केली जात होती. त्यानुसार दोन सशस्त्र पोलील कर्मचारी जरांगे पाटलांच्या सुरक्षेसाठी असणार आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट 2023 पासून आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने हे प्रकरण राज्यभर पसरले. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवट्याने आंदोलनाला व्यापक स्वरुप प्राप्त झालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करत समाजाला एकत्र करण्याच काम केलं. नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा आरक्षण मोर्चा काढला होता. त्यानंतर वाशी येथे असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करणारा अध्यादेश त्यांना दिला होता. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.