Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील 5 खासदारांचा आज सन्मान होणार

यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील 5 खासदारांचा आज सन्मान होणारनवी दिल्ली : खरा पंचनामा

संसदेत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि लोकांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदाच्या या पुरस्कारांच्या मानकरींची यादी जाहीर झाली आहे. यात महाराष्ट्रातील पाच खासदारांचा समावेश आहे.

यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दोन खासदार, शिवसेना शिंदे गटातील दोन खासदारांचा समावेश आहे. तर भाजपच्या एका महिला खासदाराचा या पुस्कारार्थीच्या यादीत समावेश आहे. आज या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. राजधानी दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या संसद रत्न पुरस्कारांचं आज वितरण होणार आहे. राजधानी दिल्लीत हा कार्यक्रम होतो आहे. महाराष्ट्रातील पाच खासदारांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. तर पश्चिम बंगालच्या काँग्रेस खासदाराचाही यात समावेश आहे. या खासदारांना आज पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भाजपच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार हिना गावित आणि काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्कार यांना जाहीर झाला आहे.

संसदरत्न पुरस्कार शिंदे गटाचे कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे. भाजपचे नेते सुकांत मजूमदार आणि सुधीर गुप्ता यांनाही पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. तर काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा यांचाही आज सन्मान होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.