Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मणेराजुरीत घर फोडणाऱ्या चोरट्यास अटक ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

मणेराजुरीत घर फोडणाऱ्या चोरट्यास अटक
३८ हजारांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

बानेसरकार उर्फ सागर टेगर पवार (वय २९, रा. गुंडेवाडी, ता. मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यातील चोरी आणि घरफोडीतील संशयितांना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना मिरज ते अंकली रस्त्यावर एक तरूण संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या पॅंटच्या खिशात सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आढळून आला. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने मणेराजुरी येथील एक घर फोडून तेथून ऐवज चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, आमसिद्ध खोत, प्रकाश पाटील, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, अभिजित ठाणेकर, रोहन घस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.