पोलिसांनी फ्रंटलाईन वर्करची भूमिका पार पाडावी : संदिप घुगे
डॉ. बसवराज तेली यांना निरोप
सांगली : खरा पंचनामा
यंदाच निवडणुकांचा वर्ष आहे. कोरोनात ज्या पद्धतीने पोलिसांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केले. अगदी तशाच पद्धतीने काम करावे. कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिस प्रशासन कोठेही कमी पडणार नाही. सामान्यांच्या मनात पोलिसांबाबत चांगली प्रतिमा कशी राहिल यादृष्टीकोनातून सर्वच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश नूतन पोलिस अधीक्षक संदिप घुगे यांनी दिले.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नत्तीने पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरिक्षकपदी बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मावळत्या आणि नूतन पोलीस अधिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
अघीक्षक घुगे म्हणाले, ‘‘ डॉ. तेली यांची प्रतिमा शांत आणि संयमी अशी आहे. त्यांच्या कार्यपध्दतीचा मला निश्चित लाभ होईल. त्यांनी जे चांगले उपक्रम सुरु ठेवले आहेत ते यापुढील काळात देखील सुरुच राहतील. यंदाचे वर्ष विशेष महत्वाचे आहे. या वर्षी निवडणुका होणार आहेत. जिल्हा पोलिस दलाने जागरुकपणे काम करुन चांगले रिझल्ट देणे अपेक्षित आहे. कोणतीही घटना घडली तर पोलिसांनी फ्रंटलाईन वर्करची भूमिका पार पाडणे गरजेचे आहे.’’
मावळते पोलिस अधीक्षक डॉ. तेली म्हणाले, ‘‘सांगलीत पंधरा महिने काम करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. राजकीय दृष्टया संवेदनशील जिल्हा म्हणून सांगलीची ओळख असली तरी माझ्या कार्यकाळात माझ्यावर कोणाचाच राजकीय दबाव आला नाही. कायद्यानुसारच काम करण्यास मी प्राधान्य दिले. काही आव्हाने आली तरी ती सहकार्याच्या सहाय्याने समर्थपणे पेलली. अजून काही दिवस सांगलीत काम करण्याची संधी मिळाली असती चांगले झाले असते. परंतु कृष्णेच्या काठी काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो’’
कार्यक्रमात अप्पर पोलिस अधिक्षक रितू खोखर, पोलीस उपअधिक्षक प्रणिल गिल्डा, निरिक्षक संजय मोरे, अविनाश पाटील, संदिप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, डीएसबीचे निरीक्षक संतोष डोके, अभिजित देशमुख आदिनी संयोजन केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.