Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक एक लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
एक लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात चोरी, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

दादा बब्रुवान पवार (वय ४५, रा. पाथर्डी, इटकूर, जि. धाराशिव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात झालेल्या घरफोडी, चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील सागर लवटे यांनी सराईत गुन्हेगार दादा पवार कुमठे फाटा येथे चोरीचे एलईडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

पथकाने ते सापळा रचला. त्यावेळी एकजण दुचाकीवर दोन एलईडी ठेवून उभे असल्याचे पथकाला दिसून आले. पथकाने तातडीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने एलईडी तांदूळवाडी येथून तर दुचाकी हातकणंगले येथून चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडील एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला कुरळप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, उदयसिंह माळी, संदीप नलवडे, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.