किशन जावळे यांनी रायगड जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला
जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली
संभाजी पुरीगोसावी
रायगड : खरा पंचनामा
रायगड जिल्ह्यासाठी महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर कोकण विभागाचे अप्पर आयुक्त किशन जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सत्र सध्या सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची बदली केल्याचे बोलले जात आहे.
मर्जींतील अधिकारी आणण्याचा खटाटोप राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्री करीत असल्याचे देखील चांगलीच चर्चा आहे. नूतन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. मावळते जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी बुधवारीच पद सोडून निर्वाचित जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दिला होता. यावेळी नूतन जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्गाने त्यांचे स्वागत केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अलिबाग प्रांत अधिकारी मुकेश चव्हाण, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच प्रशासकीय अधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील विकास कामे आणि प्रश्नांबाबत माहिती घेतली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.