Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"सरकारविरोधात असंतोषासाठी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रीय " विशेष पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची माहिती

"सरकारविरोधात असंतोषासाठी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात माओवादी सक्रीय "
विशेष पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची माहितीनवी दिल्ली : खरा पंचनामा

दिल्लीजवळ सुरु असलेल्या सध्याच्या शेतकरी आंदोलनात माओवादी संघटना सक्रीय असल्याची खळबळजनक माहिती महाराष्ट्र नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महासंचालक संदीप पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील बारसू रिफायनरी प्रकल्प तसेच आरेमधील आंदोलनातही त्यांचा सहभाग होता, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

संदीप पाटील म्हणाले, "येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सरकारविरोधात सूर कसा निर्माण होईल. तसेच शासनाला कसं बदनाम करता येईल यासाठी आपण अशी मोठी आंदोलनं सुरु करायची आहेत. ज्यामुळं शासन अडचणीत येईल, काही ठिकाणी हिंसा होईल आणि लोक कसे शासनाविरोधात जातील, अशी माओवाद्यांमध्ये चर्चा आहे. त्यांचा लोकशाहीवर आणि संविधानावर विश्वास नाही" 

गेल्यावेळी शेतकरी आदोलनाला यश आल होत त्यानतर सध्याच्या आंदोलनासाठी देखील त्यांचं भूमिगत नेटवर्क काम करत होतं. माओवादी नेते या आंदोलनाचं नेतृत्व करणार असल्याचं त्यांच्या चौकशीतून समोर आलं आहे. गेल्यावेळी संयुक्त किमान मोर्चाचे जे मुख्य नेते होते त्यांना आत्ताच सीपीआय माओवादी पक्षातून मोठं पत्रक काढत त्यांची हाकालपट्टी करण्यात आली.

या पत्रात लिहिलं होतं की, ते आमचे सेन्ट्रल कमिटी मेंबर होते, त्यांनी गेल्यावेळच्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. पंजाब, हरयाणा आणि उत्तरेतील भागातील किसान मोर्चाचे माओवादी संघटनेचं नेटवर्क आहे, असं त्यांच्याकडील कागदपत्रांवरुन समोर आलं आहे, असंही संदीप पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, माओवाद्यांचं मोडस ऑपरेंडी हीच आहे की मोठ्या प्रमाणावर हिंसा करायची त्यानतंर सरकार त्यांच्यावर कडक कारवाई करत, त्यानंतर ते सरकारपासून दूर जातात. त्यानंतर या लोकांना आपण कशा पद्धतीनं आपल्या माओवादी विचारसरणीकडं घेऊ शकतो, अशा पद्धतीनं ते काम करतात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.