Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सर्व समाजांना आरक्षणावरून खेळवले जातेय

सर्व समाजांना आरक्षणावरून खेळवले जातेय




सांगली : खरा पंचनामा

मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार हे पूर्ण अपयशी ठरले आहे. शिवाय सर्व समाजाला आरक्षणावरून खेळवले जात आहे. आपला खेळण्यासारखा वापर होतोय आणि त्यामुळे मराठा, ओबीसी दोन्ही समाजात अस्वस्थता आहे; असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

इस्लामपूरमध्ये जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने छगन भुजबळ यांच्या पेकाटात लाथ घालून त्यांना घालवले पाहिजे; अशा पध्दतीची भाषा वापरली. सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी त्या आमदाराला वास्तविक समज द्यायला हवी अथवा काढून टाकले पाहिजे होते. मंत्रिमंडळमधील मंत्र्यालाच पेकाटात लाथ घालायची भाषा करत असतील, तर दुर्दैव आहे. पण याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष देत नाहीत. त्यामुळे  ओबीसीच्या प्रश्नांकडे बघण्याचा सरकारचा दृष्टीकोन काय आहे हे लक्षात येते.

पोलीस स्टेशनमध्ये ज्या आमदाराने गोळीबार केला. त्यावर तो आमदार मुख्यमंत्री यांच्याशी त्याचे असलेल्या व्यवहारावर स्पष्टपणे बोलतो. हे राज्यात काय चालले आहे. हे लोकांना आता कळत आहे. त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण की गुन्हेगारीकरणाचे राजकारण झालेय अशी शंका वाटावी अशी परिस्थिती निर्माण झालीय. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असून देखील कायदा आणि सुव्यवस्था राज्यात नाही. मंत्रीमंडळातील मंत्र्यांना देखील सुरक्षित वाटत नाही. दुसरीकडे यांचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात, त्यामुळे यांच्या आमदारांची दहशत वाढली आहे. महाराष्ट्रची घडी बिघडवणारे हे चित्र सत्ताधारी लोकांनी निर्माण केलं. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.