Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील

बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद
बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील



बीड/छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बस पेटविल्यानंतर बीड जिल्हाही सतर्क झाला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा १० तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. तसेच बीड व जालना जिल्ह्याची बॉर्डरही सील करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस दलाकडून आता कठोर पाऊले उचलली जात असून सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात बस, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

३० ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर बीड पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. काही दिवस प्रकरण शांत झाल्यानंतर रविवारपासून मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच आवाहन केल्यानंतरही अंबड तालुक्यातील तिर्थपुरी येथे काही जणांनी बस पेटविली. तसेच जरांगे यांच्या सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे समाज आक्रमक झाला असून पुन्हा एकदा दगडफेक, जाळपोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धागा पकडून बीड जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी कठोर पाऊले उचलली आहेत. बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर आज सकाळीच सील करण्यात आली आहे. शिवाय २८ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पुढील काही तासांत १०० टक्के इंटरनेट बंद केले जाणार आहे. नागरिकांनी शांतता बाळगावी, असे आवाहन प्रशासन व पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.