Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत



मुंबई : खरा पंचनामा 

सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात मुंबई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शाहरूख खानच्या कुटुंबाकडून आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात २५ करोड रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. इनफोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी) म्हणजेच केंद्रीय संस्था अंमलबजावणी संचनालयाकडून वानखेडेंवर हा ठपका ठेवण्यात आला असून पीएमएलए (प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट) या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

अंमली पदार्थांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करणाऱ्या शासकीय यंत्रणा एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) च्या काही माजी अधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आपला प्रतिबंधात्मक बचाव करण्यासाठी करण्यासाठी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. स्टार किड आर्यन खानला जहाजावरील पार्टीत ड्रग्स घेताना पकडल्याचा दावा वानखेडे आणि एनसीबीकडून करण्यात आला होता. परंतु नंतर या प्रकरणात आर्यन खान याला क्लीन चिट मिळाली होती. यापुढील चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्याचा दावा केला जात आहे.

२०२१ मध्ये एका साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार वानखेडे व त्यांच्या साथीदारांनी २५ कोटींची मागणी खान यांच्याकडे केली होती. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांचा तपास चालू होता. यादरम्यान चौकशी सुरू असताना एनसीबी यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी संपल्यानंतर सीबीआयकडे वानखेडेंविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.