Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बारामतीत नणंद-भावजय तगडी लढत? सुनेत्रा पवारांच्या लोकसभा एन्ट्रीची नांदी

बारामतीत नणंद-भावजय तगडी लढत? 
सुनेत्रा पवारांच्या लोकसभा एन्ट्रीची नांदीपुणे : खरा पंचनामा

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एन्ट्रीची नांदी झाली आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ शहरात फिरत आहे. त्यामुळे बारामतीत आता नणंद-भाजवयांची लढतीचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुनेत्रा पवार यांची बारामती लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रचंड चर्चा होती.

अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाले. मात्र बारामती लोकसभेसाठी अजित पवार उमेदवार कोण देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामतीतील उमेदवारावर लोकसभेची गणितं अवलंबून आहे. अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभी करावी, असं भाजपच्या नेतृत्वाला अपेक्षित आहे. त्यासोबतच बारामतीतील अजित पवारांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचीदेखील हिच ईच्छा व्यक्त केली होती. आता त्याच दिशेने अजित पवार पावलं टाकताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती. वीरधवल जगदाळे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यंच्याकडे पत्राद्वारे केली होती.

सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही आहे. त्यांनी पर्यावरणाशी आणि महिलांशी संबंधित कामात त्यांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. शिवाय वेगवेगळ्या माध्यमातून त्या सामजिक कामंदेखील करतात. मात्र निवडणुकीच्या रिंगणात त्या पहिल्यांदाच उतरणार असल्याचे संकेत अजित पवारांकडून देण्यास सुरुवात झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.