Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बहनों और भाइयों... रेडिओच्या जगातील आवाजाचा जादूगार हरपला; अमीन सयानी यांचे निधन

बहनों और भाइयों... रेडिओच्या जगातील आवाजाचा जादूगार हरपला; अमीन सयानी यांचे निधन



मुंबई : खरा पंचनामा

रेडिओच्या जगातील आवाजाचे जादूगार अशी ओळख असणारे ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमीन याचा मुलगा रझील सयानी यानी अमीन सयानी यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

अमीन सयानी यांचे मंगळवारी (20 फेब्रुवारी) सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमीन सयानी यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. अमीन सयानी यांच्या पार्थिवावर उद्या (22 फेब्रुवारी) अंत्यसंस्कार होणार आहेत. आज त्यांचे काही नातेवाईक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत येणार आहेत.

अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत झाला. अमीन सयानी यांनी रेडिओच्या जगात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या आवाजाची जादू लोकांच्या मनात घर करून गेली. अमीन सयानी यांनी आपल्या कारकिर्दीला ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथून रेडिओ प्रेजेंटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

रेडिओ सिलोन आणि त्यानंतर विविद भारती वर तब्बल 42 वर्षे चाललेल्या 'बिनाका गीतमाला' या त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'गीतमाला' या कार्यक्रमामुळेच अमीन यांना लोकप्रियता मिळाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.