Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासा

गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासापुणे : खरा पंचनामा

पोलीस शिपाई ते पोलीस निरिक्षकपदापर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यशासनाकडून वर्षभरासाठी ३० अर्जित रजा दिल्या जातात. मात्र, दैनंदिन कामकाज तसेच बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था राखणे या मुळे या सुट्टयाही पोलीस कर्मचाऱ्यांना घेता येत नाहीत. त्यामुळे शासनाकडून या रजांमधील 15 दिवसांच्या रजांचे रोखीकरण ( पैसे ) त्यांना दिले जात होते. मात्र गृह विभागाकडून हा निर्णय 21 फेब्रुवारीला 2024 ला रद्द करण्यात आला होता. मात्र, यास मोठया प्रमाणात विरोध झाल्याने तसेच आमदारांकडूनही तो मागे घेण्याची विनंती करण्यात आल्याने गृह विभागाने तो लगेच 22 फेब्रुवारीला रद्द केला आहे.

हा निर्णय रद्द तातडीनं रद्द करावा अशी मागणी भाजपचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांना प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सुट्टी नसते. तर, इतर सणांच्या दिवशीही त्यांना सुट्टी नसते. त्यांना आठवड्यात केवळ एक साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे त्यांना इतर विभागां प्रमाणे वर्षाला 30 दिवस हक्काच्या (अर्जित) रजा आहेत. मात्र, कामाचा व्याप तसेच सार्वजनिक सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने त्यांना या रजा वापरता येत नाहीत. त्यामुळे शासनाने त्यांना 1989 मध्ये वर्षाला असलेल्या या रजांमधील 15 दिवसांच्या रजेच्या रोखीकरणाची सवलत दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.