Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घाईघाईत घेतली 'एनओसी'! अशोक चव्हाणांची राज्यसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी?

घाईघाईत घेतली 'एनओसी'! 
अशोक चव्हाणांची राज्यसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी?



मुंबई : खरा पंचनामा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल (सोमवारी) अचानक काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर या प्रवेशाला राज्यसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेच्या उमेदवारांचे अर्ज भरले जाणार आहेत. राज्यात ६ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये भाजपाकडून चौथा उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याकडे पाहिले जाते आहे.

त्याचबरोबर आणखी एका गोष्टीमुळे अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली ती म्हणजे, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एनोसी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. 12,300 रुपयांची थकबाकी भरून अशोक चव्हाण यांनी एनोसी प्रमाणपत्र काढले आहे. यामुळे चव्हाण यांना घाईघाईची एनओसी घेणं म्हणजे राज्यसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.