Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादांनंतर आता शरद पवार ॲक्शन मोडवर; बारामतीत तळ ठोकला

अजितदादांनंतर आता शरद पवार ॲक्शन मोडवर; बारामतीत तळ ठोकलाबारामती : खरा पंचनामा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात पावर विरूद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती दौऱ्यांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांनी मेळाव्यामधून नाव न घेतला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. मात्र अजित पवार यांच्या या मेळाव्यानंतर आता शरद पवार देखील अॅक्शन मोडवरमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.

शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. आज गोविंद बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये माढा मतदारसंघातील अकलूज, माळशिरस, वेळापूर, निमगाव आणि मळवली येथील 70 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण जो उमेदवार द्याल त्याला भरघोस मतांनी निवडून आणण्याकरिता आम्ही जीवाची बाजी लावू असं अश्वासन यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना दिलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, देशात कधी असं घडलं नाही की ज्याने पक्ष काढला त्याचाच पक्ष नेला. हा निकाल कायद्याला धरून नाही. आपण कोर्टात गेलो आहोत. एखाद्याला वाटत असेल की, एखाद्याचं चिन्ह काढून घेतलं तर त्यांचं अस्तित्व काढून घेऊ. तर तसं होत नाही. मी स्वतः पाच वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढलो आहे. कार्यकर्त्यांनो लोकांमध्ये जा, आपलं चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवा. यश निश्चित आपल्यालाच मिळणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.