Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत बंद घर फोडून २८.५२ लाखांचा ऐवज लंपास शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा

सांगलीत बंद घर फोडून २८.५२ लाखांचा ऐवज लंपास
शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा



सांगली : खरा पंचनामा

शहरातील कोल्हापूर रस्ता परिसरातील समर्थ कॉलनी येथील एक बंद बंगला फोडून चोरट्यांनी वीस लाखांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा २८.५२ लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञातांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी विनोद श्रीचंद खत्री (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहे. खत्री कोल्हापूर रस्ता परिसरातील समर्थ कॉलनी येथे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या मुलीचा विवाह असल्याने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ते बंगल्याला लावून कोल्हापूर येथे गेले होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याची माहिती तातडीने सांगली शहर पोलिसांना दिली.  

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. तसेच आतील बेडरूममधील कपाट फोडून त्यातील रोकड आणि दागिने लंपास केल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तज्ज्ञांनी हाताचे ठसे घेतले आहेत. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी एलसीबी तसेच शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरणाचे पथक विविध ठिकाणी पाठवण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास गतीने सुरू असल्याचे सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.