Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वीकारला पदभार

पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वीकारला पदभारसंभाजी पुरीगोसावी 
पुणे : खरा पंचनामा

सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाने शुक्रवारी रात्री उशिरा चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची मुंबई महानगर विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची पुणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी त्यांनी विक्रम कुमार यांच्याकडूंन पुणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. 

आयुक्त विक्रम कुमार हे २००४ तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नुकतेच ११ हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते. त्यामध्ये पुणे शहरांत असलेल्या विविध मोठ्या प्रकल्पांचा गवगवा करण्यात आला होता. त्यांच्या कार्यकाळात समान पाणीपुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना समाविंष्ट धावांना विकास अशा विविध प्रकल्पांना त्यांनी चांगलीच गती दिली होती. ऐंन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी पुणे महापालिका नव्या आयुक्तांनी आपला पदभार स्वीकारला आहे. 

डॉ. राजेंद्र भोसले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. ते २००८ तुकडीतील आयएएस अधिकारी असुन त्यांनी आतापर्यंत विविध जिल्ह्यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. डॉ. भोसले यांनी नगर जिल्ह्यात महसूल विभागाचे डिजिटल उतारे देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले होते. भोसले यांच्या सप्तपदी अभियानाचा उपक्रम राज्यभर चांगलाच गाजला होता. डॉ. राजेंद्र भोसले हे आयएएस अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जींतील अधिकारी असल्याचे बोलले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.