Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य सरकारला मद्यप्रेमींची काळजी! दर्जेदार दारु मिळावी, यासाठी जर्मनीहून मागवले महागडे ८९ यंत्र

राज्य सरकारला मद्यप्रेमींची काळजी! 
दर्जेदार दारु मिळावी, यासाठी जर्मनीहून मागवले महागडे ८९ यंत्र



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील 'मद्यप्रेमीं'ना रेस्टॉरंट आणि बारामध्ये दर्जेदार मद्य मिळावे, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने परदेशातून 'अँटनपार' नावाचे ८९ अत्याधुनिक यंत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भातही प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला असून त्याला राज्य सरकारनेही मंजुरी दिली. अशा पद्धतीचे यंत्र घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असणार आहेत.

मद्य निर्मिती आणि विक्रीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र राज्यातील परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये सर्रास मद्यात भेसळ सुरु असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे भेसळयुक्त मद्य मिळत असल्याचा तक्रारी दिवसेंदिवस वाढत जात आहे. याला आळा घालण्यासाठी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगीरी उंचावण्यासाठी जर्मन बनावटीचे अँनटपार मशीन घेण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता. 

ही अत्याधुनिक तपास यंत्र मद्याची तीव्रता व प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. या आधुनिक यंत्रामुळे मद्याचे प्रमाण दोन ते तीन मिनिटांत शोधणे शक्य आहे. ही यंत्रे आता राज्य उत्पादन शुल्क विभाग खरेदी करणार असून प्रत्येक जिल्ह्यात ही यंत्रे दिली जाणार आहे. त्यामुळे भेसळयुक्त मद्य ओळखणे आता उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकांना ओळखणे शक्य होणार आहे. हे तपासणी यंत्र खरेदीसाठी राज्य उत्पादन विभागाने खरेदीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला होता. त्यालाही राज्य सरकराने मंजुरी दिली आहे. खरेदीसाठी निविदा सुद्धा काढण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आह.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.