Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे आदेश, निरीक्षक संतोष डोके दौंडचे प्रभारी, अभिजित देशमुख जिविशाचे प्रभारी

पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे आदेश, निरीक्षक संतोष डोके दौंडचे प्रभारी, अभिजित देशमुख जिविशाचे प्रभारी



संभाजी पुरीगोसावी 
पुणे : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलात दुसऱ्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदलांचे आदेश पंकज देशमुख यांनी शुक्रवारी रात्री उशिरा दिले आहेत. विट्याचे तत्कालीन निरीक्षक संतोष डोके यांची दौंडचे प्रभारी म्हणून तर सांगली शहरचे तत्कालीन निरीक्षक अभिजित देशमुख यांची जिविशाचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

पोनि. सतोष घोळवे (नियंत्रण कक्ष ते बारामती शहर पोलीस ठाणे), पोनि. ऋषिकेश अधिकारी ( नियंत्रण कक्ष ते सासवड पोलीस ठाणे), पोनि. सतोष गिरीगोसावी (नियंत्रण कक्ष ते जिल्हा वाहतूक शाखा), पोनि. संतोष डोके (नियंत्रण कक्ष ते दौंड पोलीस ठाणे), पोनि. अभिजीत देशमुख (नियंत्रण कक्ष ते जिल्हा विशेष शाखा), पोनि. चंद्रशेखर यादव (नियंत्रण कक्ष ते बारामती शहर वाहतूक), पोनि. दिनेश तायडे (बारामती शहर पोलीस ठाणे ते बारामती उप मुख्यालयात). 

स.पो.नि. संदेश बावकर (भिगवण पोलीस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), स.पो.नि. विनोद महांगडे (सासवड पोलीस ठाणे ते भिगवण पोलीस ठाणे), पो.उनि. जयश्री भोमकर (नियंत्रण कक्ष ते कामशेत पोलीस ठाणे), पो.उनि. बजरंग झेडें (नियंत्रण कक्ष ते रांजणगांव पोलीस ठाणे), पो. उनि. शीतलकुमार डोईजड (नियंत्रण कक्ष ते वडगांव मावळ पोलीस ठाणे), सपोनि सुनील हारुगडे (नियंत्रण कक्ष ते आर्थिंक गुन्हे शाखा), पो.उनि. दीप्ती करपे (नियंत्रण कक्ष ते भोर पोलीस ठाणे), पो.उनि. प्रियांका सराटे (नियंत्रण कक्ष ते नियंत्रण कक्ष येथे संलग्न), पो.उनि. प्रवीण कांबळे (नियंत्रण कक्ष ते उरळीकांचन पोलीस ठाणे), पो.उनि. कृष्णराज पवार (नियंत्रण कक्ष ते राजगड पोलीस ठाणे), पो.उनि. अर्जुन चोरगे (नियंत्रण कक्ष ते सासवड पोलीस ठाणे), पो. उनि. मनोज पाटील (नियंत्रण कक्ष ते ऊरळीकांचन पोलीस ठाणे), पो. उनि. अशोक राऊत (नियंत्रण कक्ष ते बारामती शहर पोलीस ठाणे), आप्पासो पडळकर (नियंत्रण कक्ष ते वेल्हा पोलीस ठाणे). 

नव्या पदस्थापने ठिकाणी तात्काळ रुजू होऊन आपला अहवाल पोलीस मुख्यालयाकडे सादर करावा असा देखील आदेश बदल्या आदेशात नमूद करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.