Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माझी लायकी किती, माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच!

माझी लायकी किती, माझा आवाका काय हे अजित पवारांना दाखवणारच!मुंबई : खरा पंचनामा

कोण विजय शिवतारे, त्याची लायकी काय असं विचारणारे अजित पवार आता का घाबरले आहेत, माझी लायकी काय आणि अवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच असा ठाम पवित्रा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतला. बारामतीच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवतारे यांनी हे वक्तव्य केलं. विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे.

मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय, मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत, असा दावा शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला. विजय शिवतारे यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उभं राहण्याचा पवित्रा शिवतारेंनी घेतला आहे.

दरम्यान, विजय शिवतारेंनी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आपली भूमिका नव्याने स्पष्ट केली. या भेटीनंतर शिवतारे म्हणाले, "मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय. त्यांना मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे. मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे"

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.