शिवसेना शिंदे गटाचे ८ उमेदवार जाहीर
कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक, हातकणंगलेमधून धैर्यशील माने
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राहुल शेवाळे, संजय मंडलीक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.
असे आहेत आठ उमेदवार,
1. मुंबई दक्षिण मध्य- राहुल शेवाळे
2. कोल्हापूर - संजय मंडलिक
3. शिर्डी - सदाशिव लोखंडे
4. बुलडाणा - प्रतापराव जाधव
5. हिंगोली- हेमंत पाटील
6. मावळ- श्रीरंग बारणे
7. रामटेक- राजू पारवे
8. हातकणंगले - धैर्यशील माने
बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरुवारी बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना डावलून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
संजय गायकवाड यांनी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज पक्षाकडून भरल्याची माहिती आहे. कार्यकर्ते आणि जनतेच्या आग्रहास्तव उमेदवारी अर्ज भरल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु आता पक्षाने पुन्हा विद्यमान आमदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये खुद्द श्रीकांत शिंदे यांचेच नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.