Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'दादांना गृहमंत्रीपद देणार नाही..'

'दादांना गृहमंत्रीपद देणार नाही..'



बारामती : खरा पंचनामा

बारामती शहरातील अत्याधुनिक बस स्थानक, पोलीस उप मुख्यालय, पोलीस वसाहत तसेच नमो महा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, उपसभापती नीलम गोरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

एकाच मंचावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच दिग्गज उपस्थित असल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. या सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जाणार वाटत होते मात्र, देवेंद्र फडणवीस वगळता कुणीही राजकीय टोलेबाजी केली नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी भाषणा दरम्यान शरद पवार गटाच्या विरोधात केली नाही तर त्यांनी थेट अजितदादांनाच चिमटे काढले. अजितदादा यांना गृहमंत्रीपद देण्यास जाहीरपणे नकारही दिला. 'अजितदादा मला हळूच म्हणू शकतात, की पीएमसीच (प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट) का, खातंच माझ्याकडे द्या, पण ते देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेन" असं देवेंद्र फडणवीस म्हणताच मंचावर हशा पिकला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.