Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई, सांगली, साताऱ्यातील गुन्हे उघड

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक
सांगली शहर पोलिसांची कारवाई, सांगली, साताऱ्यातील गुन्हे उघड



सांगली ः खरा पंचनामा

सांगली, सातारा जिल्ह्यात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सांगली, सातारा जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.  

आकाश प्रकाश चव्हाण (वय २४, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरात घरफोडी करणाऱ्यांना अटक करण्याच्या सूचना निरीक्षक मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील संतोष गळवे यांना सराईत गुन्हेगार सांगलीतील वाल्मिकी आवास योजना परिसरात चोरीचा ऐवज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. 

पथकाने तेथे सापळा रचला. परिसरात एक तरूण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे पथकाला दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात सोन्याचे दागिने सापडले. त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगली तसेच साताऱ्यातील बोरगाव येथे घरफोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली. दागिने जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सांगलीतील दोन तर साताऱ्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे. 

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, पृथ्वीराज कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.