Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट! सर्व नोकरभरत्यांवर कोर्टाची मोठी टिप्पणी

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी अपडेट! 
सर्व नोकरभरत्यांवर कोर्टाची मोठी टिप्पणी



मुंबई : खरा पंचनामा

मराठा आरक्षण देण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कुठलीही सरकारी नोकर भरती ही न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहील, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी, दि. ८ मार्च २०२४ ला सुनावणीच्या वेळी दिले.

महाराष्ट्र सरकारे मराठा समाजाला मागसवर्ग आयोगाच्या अहवालानुसार १० टक्के आरक्षण देणारा कायदा केला होता. राज्य सरकारच्या या कायद्याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नोकर भरती संदर्भात हा निर्णय दिला. या याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवार, दि. १२ मार्च २०२४ ला होणार आहे.

महाराष्ट्र सरकारने आणलेल्या मराठा आरक्षण कायद्यानुसार, मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांसाठी दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा होताच, महाराष्ट्र सरकारने राज्यातील हजार जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासोबतच शिक्षक भरती सुद्धा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण रद्द करण्यात यावे, सोबतच ही भरती प्रक्रिया थांबवण्यात यावी, अशी मागणी करणाची याचिका वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. सुनावणीवेळी न्यायालयाने भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरती प्रक्रिया न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीनच असेल, असे सांगितले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.