Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत 'बर्निंग कार'चा थरार!

सांगलीत 'बर्निंग कार'चा थरार!सांगली : खरा पंचनामा

सांगली मिरज रस्त्यावरील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयानजीक सोमवारी सायंकाळी 'बर्निग कार' चा थरार पहावयास मिळाला. परिसरातील क्रीडांगणावरील प्रदर्शन पाहण्यासाठी यशवंतनगर येथून आलेले कुटुंबिय चारचाकीमधून खाली उतरताच अचानक कारने पेट घेतला. यामध्ये कारचा अक्षरश: कोळसा झाला. 

अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्धा ते पाऊण तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. विश्रामबाग परिसरातील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयानजीक मागील काही दिवसांपासून एक प्रदर्शन सुरु आहे. ते पाहण्यासाठी सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास शरद नलवडे (रा. यशवंतनगर, सांगली )  कारमधून (एमएच १० डीक्यू ०५३९) आले होते. प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारापाशी त्यांनी वाहनातील पत्नी, मुलगी यासह घरातील सदस्यांना उतरवले आणि कार पार्किंग करण्यासाठी ते निघाले. परंतु वाहनाच्या मागील बाजूकडून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तातडीने शरद नलवडे कारमधून खाली उतरले आणि क्षणार्धात कारने पेट घेतला. अवघ्या काही सेकंदात आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये कार पूर्ण जळून खाक झाली. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.