Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी पुन्हा डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्याकडे ! मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश

नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी पुन्हा डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांच्याकडे ! 
मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश



नाशिक : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या जानेवारी महिन्यात राज्यातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांची बदली केली होती.

त्याविरोधात त्यांनी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेतली असता, कॅटने बदलीला स्थगिती देत पुन्हा नियुक्तीचे आदेश देण्याचा निर्णय दिला होता.

परंतु या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर सुनावणी बुधवारी (ता. २०) होऊन कॅटचाच निकाल कायम ठेवला. त्यामुळे डॉ. शेखर-पाटील यांनी बुधवारी (ता. २०) सायंकाळी पुन्हा नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारत कामकाजाला प्रारंभ केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गृहविभागाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या गेल्या ३१ जानेवारी रोजी बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यानुसार नाशिक पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर-पाटील यांची पुणे येथे बदली केली होती. तर, ठाण्याचे सहआयुक्त दत्ता कराळे यांची नाशिकचे नवीन विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली केली होती.

या बदलीच्या विरोधात डॉ. शेखर पाटील यांनी कॅटमध्ये धाव घेत दाद मागितली होती. डॉ. शेखर-पाटील हे ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार सेवानिवृत्तीला १ वर्षे राहिल्यास अशा अधिकाऱ्यांनी बदली करू नये असे संकेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.