Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आभासी चलन प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारीच चौकशीच्या फेऱ्यात!

आभासी चलन प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारीच चौकशीच्या फेऱ्यात!



पुणे : खरा पंचनामा

आभासी चलन प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. गेल्या आठवडाभरापासून पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोपनीय चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यांच्याकडून मोबाइल संच, लॅपटॉप, अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही चौकशी सुरू नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

आभासी चलन प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह चौघांना दररोज सकाळी चौकशीसाठी बोलाविण्यात येत आहे. या प्रकरणात लेखापरीक्षण करणाऱ्या एकाला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, तसेच पोलीस निरीक्षकाकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. आभासी चलन फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह एका संगणकतज्ज्ञाला अटक केली होती. आभासी चलन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेले आभासी चलन संगणकतज्ज्ञ आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या खात्यात वळविले होते. तपासात या बाबी उघडकीस आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. सायबरतज्ज्ञाने आरोपींकडून जप्त केलेले ६० बिटकॉईन स्वतःच्या खात्यात वळविले होते. जप्त केलेल्या बिटकॉईनचे मूल्य २० कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.