Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक २३ तोळ्यांचे दागिने जप्त, एलसीबी, संजयनगर पोलिसांची संयुक्त कारवाई

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक
२३ तोळ्यांचे दागिने जप्त, एलसीबी, संजयनगर पोलिसांची संयुक्त कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

कुपवाड येथील मंगलमूर्ति कॉलनीतील बंद घर फोडून ऐवज लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात आले. त्याच्याकडून सव्वापाच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. एलसीबी आणि संजयनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

आकाश सतीश कवठेकर (वय २६, रा. उमेदनगर, रा. कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुपवाडमधील मंगलमूर्ति कॉलनी येथील वैजयंता बेरडे या दि. ८ मार्च रोजी घर बंद करून परगावी गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्या परत आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील संशयिताला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते.  

पथक चोरट्याचा शोध घेत असताना पथकातील बिरोबा नरळे यांना कुपवाडमधील चोरी आकाश कवठेकर या सराईत गुन्हेगाराने केल्याची माहिती मिळाली. तसेच तो सांगलीतील आपटा पोलिस चौकीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून आकाश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने कुपवाडमधील घर फोडून दागिने लंपास केल्याची कबुली दिली. शिवाय त्याने चोरीचे दागिने त्याच्या घरामागील जागेत पुरून ठेवल्याचीही कबुली दिली. पोलिसांनी ते दागिने जप्त केले. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, संजयनगरचे निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोजकुमार लोंढे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, सागर पाटील, बिरोबा नरळे, संदीप गुरव, संदीप नलवडे, अमर नरळे, विनोद साळुंखे, संतोष पुजारी, दीपक गायकवाड, कपील साळुंखे, कॅप्टन गुंडवाडे  आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.