Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपाला धक्का; उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांची निवडणुकीतून माघार

भाजपाला धक्का; उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांची निवडणुकीतून माघार



कोलकाता : खरा पंचनामा

भाजपाने शनिवारी (२ मार्च) १६ राज्यातील १९५ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाला धक्का बसला आहे. कारण पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभेसाठी भोजपुरी अभिनेते आणि गायक पवन सिंह यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनी आज रविवारी आपण निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले. एक्स वर एक पोस्ट टाकून त्यांनी निवडणूक लढविता येणार नसल्याचे सांगितले आहे.

या पोस्टमध्ये पवन सिंह म्हणाले, 'मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मला आसनसोलसाठी उमेदवारी दिली. पण मी काही कारणास्तव आसनसोल या मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित नाही.' या पोस्टमध्ये पवन सिंह यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना टॅग केले आहे.

पवन सिंह यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. बंगालमधील लोकांच्या ताकदीमुळेच पवन सिंह यांना माघार घ्यावी लागली, असा टोला बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट टाकून लगावला.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या उत्तर प्रदेशमधील मथुरा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. भाजपाने त्यांना यंदा तिसऱ्यांदा मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. अभिनेता पवन सिंहला पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं होतं. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे सध्या आसनसोलचे खासदार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.