Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा!

माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा!मुंबई : खरा पंचनामा

मुंबई हायकोर्टाने माजी पोलिस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

नोव्हेंबर 2006 च्या लाखनभैया बनावट चकमक प्रकरणातील 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. ट्रायल कोर्टाने 13 अन्य आरोपींना दोषी ठरवले होते आणि प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती.

परंतु हायकोर्टाने प्रदीप शर्माची निर्दोष सुटका रद्द केली आणि पुराव्याच्या आधारे त्यांना दोषी ठरवले. एकूण 13 आरोपींना हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातीलही आरोपी आहेत.

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत एक अधिकारी होते. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नावावर 100 हून अधिक चकमकींचा विक्रम आहे. ते 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले आणि 2019 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. यानंतर, 25 फेब्रुवारी 2021 रोजी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलिया बाहेर स्फोटक पदार्थ सापडल्याच्या प्रकरणामुळे ते चर्चेत आले. याप्रकरणी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला अटक करण्यात आली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.