Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसचं बनले ड्रग्सचे रखवालदार! पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स प्रकरणी PSI ला अटक

पोलिसचं बनले ड्रग्सचे रखवालदार! 
पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स प्रकरणी PSI ला अटक



पिंपरी चिंचवड : खरा पंचनामा

पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स प्रकरणी एका PSI ला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसचं ड्रग्सचे रखवालदार बनले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. विकास शेळके असं अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच नाव आहे. ते निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास रक्षक चौकात दोन कोटींच मेफेड्रोन ड्रग्स आढळलं होत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी नमामी झा ला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना ड्रग्स प्रकरणात आता निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच नाव समोर आलं आहे. अशा गंभीर गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्याचे नाव आल्याने पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी केलेल्या कारवाईत दोन किलो आणि आजच्या कारवाईत पोलिसाकडूनच 42 असे एकूण 45 किलो एमडी ट्रक्स जप्त करण्यात आलं. या ड्रग्स ची किंमत तब्बल 45 कोटी इतकी आहे. या तपासादरम्यान पिंपळे निलखमधल्या रक्षक चौकात एका अज्ञात व्यक्तीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर ही बाब उघड झाली आणि नमामी शंकर झा अस अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी थेट पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.