Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निषेधाचे सूर, 17 हजार लोकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; कारवाईची मागणी

पंतप्रधानांच्या वक्तव्यावर निषेधाचे सूर, 17 हजार लोकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; कारवाईची मागणीनवी दिल्ली : खरा पंचनामा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कथित मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ घेत केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात असून १७ हजारांवर लोकांनी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून या वक्तव्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी डॉ. सिंग यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन काँग्रेस सर्व संपत्ती मुस्लिम समाजाला देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा केला होता. मात्र पंतप्रधान मोदी यांचे भाषण वस्तुस्थितीला धरून नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले व त्यावेळची चित्रफीत व्हायरल केल्यानंतर सर्व विरोधी पक्षनेते व समाजातील सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

गेल्या दहा वर्षात भाजपने अल्पसंख्याक व दलिताची फसवणूक केली आहे, असा शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल पंतप्रधानांवर उलटवार केला आहे. पंतप्रधानांनी द्वेष पसरविणारे विधाने करायला नको. आज मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. उद्या, शिख समाजाला लक्ष्य केले जाणार आहे, अशी भीती अकाली दलाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून मला यापेक्षा चांगले अपेक्षित नाही, अशी व्यंगात्मक प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांची वक्तव्ये गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया एक्सवर ट्रेंडिंग होत आहे. संविधान बचाव नागरिक अभियानने निवडणूक आयोगाला हजारो लोकांचे स्वाक्षरीचे पत्र पाठविले आहेत. समाजात दुही निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून यावर आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

निवडणूक आयोगाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाच्या प्रसिद्ध विभागाला विचारणा केल्यानंतर यावर केंद्रीय निवडणूक आयोगाला काहीही बोलायचे नाही, असे स्पष्ट केले आहे. काँग्रेसने दिलेल्या निवेदनावरही कोणताही प्रतिक्रियानिवडणूक आयोगाने दिली नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.