Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला!

शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला!



मुंबई : खरा पंचनामा

शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे

शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांवर कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. हे चौघे कोण आहेत? यामागे नेमका कुणाचा हात आहे? याबाबत पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा गैरप्रकार घडला आहे. मात्र अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याचीही काही पहिली वेळ नाही. या आधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते. शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे.

ही गंभीर बाब आहे. हे पहिली वेळ नसून दुसरी वेळ आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यतच पर्यटन विभागाच्य खात्यातून 67 लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन पोलिस करत आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा घटना घडत असून निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे विभागाकडे लक्ष आहे की नाही असाच सवाल या निमित्ताने उपस्थित आहे. मंत्रालयात जी बँक आहे तिथून ही रक्कम चोरीला गेली आहे. ज्या आरोपीच्या खात्यातून ही रक्कम चोरीला गेली आहे ही सर्व खाती कोलकाता येथील आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून आता तरी शासन काय करणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.