Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ, पहिल्या टप्प्यातील मतदान, विदर्भातील 5 जागांचा समावेश

लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ, पहिल्या टप्प्यातील मतदान, विदर्भातील 5 जागांचा समावेशनागपुर : खरा पंचनामा

आजपासून पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठीचे मतदान पार पडत आहे. देशातील १०२ जागांवर मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागा आहेत.

२१ राज्यांत १०२ मतदार संघात १ हजार ६२५ उमेदवार निवडणूक लढवणार आहे. सकाळी ७ वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ पर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा – गोंदिया, गडचीरोली आणि चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे. नक्षली भागातसह संवेदनशील मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

गडचिरोली मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन मतदानाची वेळ असणार आहे. नागपुरात लोकसभा मतदारसंघात ६१ संवेदनशील मतदान केंद्र आहेत तर रामटेक लोकसभा मतदारसंघात ६३ संवेदनशील मतदान केंद्र आणि नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण ४५१० मतदान केंद्र आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात २१०५ मतदारसंघ, तर रामटेकमध्ये २४०५ मतदान केंद्र आहेत. अति संवेदनशील बूथवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे, तर मतदान काळामध्ये शहरात सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदार रामटेक आणि नागपूर लोकसभा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये टाकणार आहे, त्यामुळे विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि पराजय कोणाचा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.