Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आरक्षणानंतर तरूणांना आजपासून 'एसईबीसी'चे प्रमाणपत्र; उत्पन्न दाखला मिळणार

मराठा आरक्षणानंतर तरूणांना आजपासून 'एसईबीसी'चे प्रमाणपत्र; उत्पन्न दाखला मिळणार



मुंबई : खरा पंचनामा

मराठा समाजातील तरुणांना आता 'एसईबीसी'चे (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक) प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने ऑनलाइन संकेतस्थळावर 'एसईबीसी'चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

सोमवारपासून अर्जदार तरुणांना एसईबीसीचे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे, पण तहसीलदारांकडील उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमीलेअर व त्यानंतर जात प्रमाणपत्र, यासाठी मोठा कालावधी लागेल. त्यावर आता जिल्हा प्रशासन काय मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सध्या १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता १५ एप्रिलपर्यंत आहे. मराठा समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास तरुणांना (एसईबीसी) या भरतीत आरक्षण आहे. पण, त्यांना अद्याप 'एसईबीसी'चे प्रमाणपत्र मिळाले नसून त्याची मुदत देखील ३० ते ४५ दिवस असल्याने भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना त्याची पोच पावती चालणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.