Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बेंगळुरुच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्याला एनआयएने घेतले ताब्यात

बेंगळुरुच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्याला एनआयएने घेतले ताब्यात



नवी दिल्ली : खरा पंचनामा

बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बुधवारी तीन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकून मुख्य सूत्रधाराला अटक केली.

NIA पथकांनी कर्नाटकातील १२, तामिळनाडूतील ५ आणि उत्तर प्रदेशातील एक अशा १८ ठिकाणी कारवाई केल्यानंतर मुझम्मिल शरीफला सह-षड्यंत्रकार म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर संशयित म्हणून तीर्थहल्ली येथील भाजप नेते साईप्रसाद यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. त्याचा दोन संशयिताबरोबर संबध असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान काँग्रेस नेता दिनेश गुंडू राव ने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी तीर्थहल्ली येथील भाजप नेते साईप्रसाद यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. भाजप नेत्याला NIA ने ताब्यात घेतल्यामुळे रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटात भाजपचा हात आहे असे नाही का? धार्मिक रक्षणाच्या नावाखाली भाजप राज्यात जो भगवा दहशतवाद चालवत आहे, त्यातून गंभीर समस्या निर्माण होत आहेत, यापेक्षा आणखी काही पुरावा हवा का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणी देशावर लादणाऱ्या केंद्रीय भाजपला याला काय म्हणायचे आहे? राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न न विचारता रामेश्वरम बॉम्बस्फोट प्रकरणाचा ठपका काँग्रेस सरकारवर ठेवणाऱ्या भाजपच्या प्रदेश नेत्यांना आता उत्तर द्यावे लागेल.

१ मार्च रोजी बेंगळुरूच्या ब्रूकफिल्ड, ITPL रोड येथे असलेल्या कॅफेमध्ये IED स्फोटाचा समावेश आहे. या स्फोटात अनेक ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी काही गंभीररित्या जखमी झाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.