"साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही"
कोल्हापूर : खरा पंचनामा
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र यावर तोडगा न निघाल्याने उद्धव ठाकरे गटाने याठिकाणी सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
यामुळे या मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
सतेज पाटील म्हणाले, की ही जागा शिवसेनेच्या वाट्याची असल्याने त्यांनी निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे. राजू शेट्टींच्या चर्चेला अंतिम स्वरूप देता आले नाही. या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद आहे. राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही असे मिश्किलपणे टिपण्णी सतेज पाटील यांनी केली.
महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. याठिकाणी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत बोलताना पाटील यांनी विश्वजित कदम यांचा या जागेसाठी प्रामाणिक प्रयत्न असून त्यांची नाराजी स्वाभाविक असल्याचे सांगत यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून लवकर या संदर्भातील तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.