Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल १ जूनपासून लागू होणार नवा नियम

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठा बदल
१ जूनपासून लागू होणार नवा नियममुंबई : खरा पंचनामा

ड्रायव्हिंग लायसन्स (वाहनचालक परवाना) मिळविणे हे सोपे काम नाही. या परवान्यासाठी लेखी परीक्षेपासून ते वाहन चालविण्याच्या चाचणीपर्यंत अनेक प्रक्रियांतून जावे लागते.

चाचणीसाठी आरटीओमध्ये तासन् तास लांब रांगेत उभे राहावे लागते. पण, आता या सर्व समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. कारण- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नवीन नियम आणत आहे. या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला चाचणी देण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) व्यक्तींना ड्रायव्हिंग चाचणी देण्याची गरज नाही. त्याऐवजी खासगी संस्थांना आता चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे की, ते प्रशिक्षणार्थीना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात. हे नियम १ जून २०२४ पासून लागू होतील.

नवीन नियमांनसार स्थळानरूप ठरवन दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवल्यास हजार ते दोन हजार रुपये एवढा दंड असेल. अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना पकडली गेल्यास, त्यांना २५ हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच वाहनमालकाचे वाहन नोंदणी प्रमाणपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाईल आणि वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत अल्पवयीन मुलांना परवाना मिळू शकणार नाही.

रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन चालक परवान्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांमध्येही बदल केले आहेत. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांच्या परवान्यांमध्येही गरजेनुसार बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज प्रक्रिया आता सुलभ होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.