Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विशाल पाटील यांना वंचितचा पाठिंबा तीन उमेदवारांचीही केली घोषणा

विशाल पाटील यांना वंचितचा पाठिंबा
तीन उमेदवारांचीही केली घोषणा



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभेसाठी सांगलीतून अपक्ष लढत असलेल्या विशाल पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. आज (मंगळवारी) वंचित बहुजन आघाडीने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून आणखी तीन उमेदवार जाहीर करत, सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंपा देत असल्याची माहिती दिली.

वंचित बहुजन आघाडीने तीन उमेदवारांची घोषणाही या पोस्टमध्ये केली आहे. कल्याणमधून जमील अहमद, मुंबई उत्तर-मध्य येथून संतोष अंबुलगे, मुंबई दक्षिणमधून अफजल दाऊदानी यांना उमेदवारी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे नातू असलेल्या विशाल पाटील यांना गेली दोन ते तीन महिने काँग्रेसकडून तिकिट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. मात्र, महाविकास आघाडीत काही अनपेक्षित घडामोडी घडल्यानंतर ही जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला सुटली.

काँग्रेस पक्षाला जागावाटपात ही जागा आपल्याकडे राखता न आल्याने नाराज विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना माजी मंत्री अजित घोरपडे आणि जतचे माजी आमदार विलास जगताप यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच हे दोघेही विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय आहे. आता वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने सांगलीच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.