Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रदीप शर्माना सर्वोच्च दिलासा, जन्मठेपेच्या निर्णयाला स्थगिती

प्रदीप शर्माना सर्वोच्च दिलासा, जन्मठेपेच्या निर्णयाला स्थगितीमुंबई : खरा पंचनामा

माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा याला बनावट चकमक प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात प्रदीप शर्मा याला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या जन्मठेपेच्या आदेशाला पुढील निर्देशापर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. 

2006 साली झालेल्या लखन भैया बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा याला मुंबई उच्च न्यायालयाने 19 मार्च 2024 रोजी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. याआधी लखन भैया फेक एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची दोष मुक्ती रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच प्रदीप शर्मा याला शरण येण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. यानंतर प्रदीप शर्मा याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

सर्वोच्च न्यायालयात प्रदीप शर्मा दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्देश मिळेपर्यंत स्थगिती कायम असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होईल. तोपर्यंत प्रदीप शर्मा याला बनावट चकमक प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धच्या अपिलात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची प्रतिक्रिया मागवली आहे. एकंदरीत प्रदीप शर्मा याला जन्मठेपेची शिक्षा आणि शरण येण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे प्रदीप शर्मा याला मोठा दिलासा मिळाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.