Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस ठाण्यात ड्यूटीवरील पोलीसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कुरुंदवाड येथील घटना, पोलिस दलावर शोककळा

पोलीस ठाण्यात ड्यूटीवरील पोलीसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
कुरुंदवाड येथील घटना, पोलिस दलावर शोककळाकुरुंदवाड : खरा पंचनामा
          
पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना पोलीस नाईकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज शुक्रवारी पहाटे कुरुंदवाड येथे ही घटना घडली. त्यांच्या अचानक निधनामुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

अरुण बालाजी नागरगोजे (वय 38) असे मृत पोलिसाचे नाव आहे. नागरगोजे गुरुवारी रात्रपाळीच्या ड्यूटीवर होते. शुक्रवारी पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकाऱ्यानी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. याची माहिती मिळताच कुरुंदवाडचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तातडीने हॉस्पिटलकडे धाव घेतली.
           
अरुण नागरगोजे हे मूळ लातूर जिल्ह्यातील पाटोदा येथील रहिवाशी होते. कुरुंदवाड येथे तीन वर्षांपूर्वी त्यांची बदली झाली होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.